अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील रहिवासी असलेल्या एका डॉक्टरांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
कालच सकाळी सोनई येथील एक डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता, अवघ्या चोवीस तासांत आणखी एका डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

File Photo प्रतीकात्मक फोटो
दत्ताचेशिंगवे येथील एक डॉक्टर सोनई येथे गेल्या अनेक दिवसापासून खाजगी प्रॅक्टिस करत असताना त्यांना कोरोणाची लागण झाली त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते.
परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. त्यांचे मूळ गाव दत्ताचेशिंगवे असल्यामुळे शिंगवे गावातही सतर्कता बाळगण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा