अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असून रुग्णाच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यू होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.
आज नेवासा तालुक्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नेवासा येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तीन चार दिवसांपासून प्रकृती खालवल्याने सदरील कर्मचाऱ्यांला नगर येथे हलवण्यात आले.
आज दुपारी सदरील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून समजले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा