अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.नगर जिल्ह्यातील पोलिसाचा करोनाने घेतलेला हा पहिला बळी ठरला आहे.
पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या 55 वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे आज जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
पोलिस मुख्यालयात सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत असलेल्या व नगर शहरातील रहिवासी असलेल्या या पोलिसदादाला मंगळवारी (दि. 14) करोनाची लागण झाली होती.
त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
पोलिस मुख्यालयात कार्यरत असताना गेल्या चार-पाच महिन्यांत करोना बंदोबस्तासाठी ते विविध ठिकाणी करोनायोद्धा म्हणून जबाबदारी पार पाडत होते.
सतत हसतमुख व सर्वांशी मिळून मिसळून राहणार्या या लोकप्रिय पोलिस अधिकार्याच्या निधनाने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा