अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी इथं दुचाकीला कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला.
हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि. १८) रात्री झाला. निवृत्ती नागनाथ पवार (वय १३, रा. सांगवी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.
बारामतीकडे जाणाऱ्या कारने (क्र. एम. एच. ४२, ए. एक्स ७६७७) दुचाकीवरुन रस्ता ओलांडून जात असतांना भरधाव वेगात आलेल्या कारने निवृत्ती पवारच्या दुचाकीला धक्का दिला.
निवृत्ती हा घरी पाणी आणायला गेला होता. आई वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]