अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- दारूच्या नशेत कंटेनर चालकाने दोन बसला धडक दिली. यानंतर हा कंटेनर भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात बस चालक अन्सार सत्तार शेख (पंचपीर चावडी, नगर) हे जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झाले आहे.
हा अपघात शहरातील चांदणी चौकात झाला. याप्रकरणी कंटेनर चालक अनिल किसन परते (रा. धुमा जि. शिवणी, मध्यप्रदेश) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी अन्सार शेख यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील तारकपूर आगाराची बस घेऊन चांदणी चौकातून चालले होते. त्यांच्या पुढे दुसरी बस चालली होती.
यावेळी कंटेनर चालक परते याचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने त्याने दोन्ही बसला धडक दिली. यानंतर हा कंटेनर जिल्हा सैनिक संरक्षण कार्यालयाच्या भिंतीवर जाऊन आदळला. अपघातानंतर सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर कंटेनर चालकाला स्थानिकांनी ताब्यात घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved