अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका एका कोरोनाबाधित रुग्णाने थेट हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दरम्यान उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.

गोरक्ष महादेव मतकर (वय 33) असे मृत्यु झालेल्या रुग्णाचे नाव आहे. गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या कोरोनाबाधित रुग्णाने थेट रुग्णालयच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हा 33 वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर मागील दहा दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान तो सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास त्याने पळत येऊन हॉस्पिटलची काच तोडून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.

त्यानंतर खाली पडून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तोफखाना पोलिसांना घटेनची माहिती देण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment