अहमदनगर ब्रेकिंग : आता या तालुक्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही आता कोरोनाचा रुग्ण आढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुबंईहुन संबंधीत शिक्षक(वय 56) व त्यांचा मुलगा आपल्या मूळगावी लिंगदेव येथे आले होते. दिनांक 13 मे रोजी मुंबईहून लिंगदेव येथे आल्यावर त्यांना कोरंटाइन करण्यात आले होते.

काल त्यांची कोरंटाईनची मुदत संपल्याने स्थानिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार संगमनेर येथील एका खासगी रुग्णालया मार्फत त्यांची तपासणी करण्यात आली.

त्यात या शिक्षक रुग्णाचा अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. अकोले तालुक्यात करोना चा प्रादुर्भाव झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

हा तपासणी अहवाल खासगी प्रयोगशाळेचा असल्याचे समजते. आता सरकारी प्रयोगशाळेत त्यांचा स्वेब पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान या व्यक्तीला कोरोनाची बाधा कशी झाली याची माहिती अद्याप मिळाली नाही.त्यामुळे अकोले प्रशासनाची आता धांदळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment