अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : वाळूज एमआयडीसीतून गावी सोनई येथे आलेल्या कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याने प्रशासनाने तत्परता दाखवत त्याच्या संपर्कातील वीस जणांना क्वारंटाइन करत सर्वांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले.

दरम्यान, मृत व्यक्तीने पाथर्डी तालुक्यातील एका लग्न समारंभास हजेरी लावली होती, अशी माहिती पुढे आली. सोनई येथील ५४ वर्षीय व्यक्ती वाळूज येथे कंपनीत काम करत होती.

कंपनीतील काही कामगार पॉझिटिव्ह आढळल्याने ही व्यक्ती जूनच्या शेवटच्या आठवड्यात घरी आली. ४ जुलैला त्रास होऊ लागल्याने त्यास सोनईतील खासगी रूग्णालयात नेण्यात आले.

दुसऱ्या दिवशी त्रास वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. नगर येथेच नातेवाईकांसमक्ष अंत्यविधी करण्यात आला.

दरम्यान, तहसीलदार रुपेश सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांना ही माहिती समजताच त्यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन

संपर्कातील २० व्यक्तींचे नेवासे येथील कोविड केअर सेंटरमध्ये स्त्राव घेऊन ते नगर येथे तपासणीसाठी पाठवले. त्यात नातेवाईकांसह स्थानिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती मिळाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment