अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :कोपरगाव पालिकेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद हे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे, तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून,
विना मास्क, विना हेल्मेट, सोबत वाहनाची कागदपत्रे न बाळगता त्याच्याकडील मोटार सायकलवरून शहरातील डॉ. आंबेडकर चौकात फिरताना आढळल्याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हेडकाॅन्स्टेबल राजू पुंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मेहमूद सय्यद हे त्यांच्यापासून मानव जिवाला व आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका होईल
हे त्यांना माहीत असून देखील त्याने विनाकारण गर्दी करून समाजास धोका पोहोचेल, असे कृत्य केले. यावरून त्यांच्याविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद मनोहर सय्यद यांनीच काल रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास डॉ. आंबेडकर चौकात आपल्या दुचाकीवर कुठलेही कागदपत्र न बाळगता
व शहरात व तालुक्यात कोरोना विषाणूची साथ सुरू आहे हे माहिती असतानाही आपल्या तोंडाला कुठलीही मुखपट्टी न बांधता इतर नागरिकांच्या आरोग्याला बाधा होईल, असे वर्तन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews