अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी धाडसी दरोडा; पोलीस घटनास्थळी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून रात्री श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर शिवारात धाडसी दरोडा टाकून सहा तोळे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.(Ahmednagar Breaking)

बेलापूर तेथील श्रीरामपुर- अहमदनगर बायपास रोडजवळील पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घरावर रात्री चोरट्यांनी दरोडा टाकला,

त्यात साडेतीन लाखाचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती आहे. पाच ते सहा जणांनी हा दरोडा टाकला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या धाडसी चोरी, दरोड्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe