अहमदनगर ब्रेकिंग : तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्याच्या सहा म्हशी ठार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने कोकणासह गोव्यात प्रचंड नुकसान केले आहे.

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या वादळाने अनेक जिल्ह्यात झाडे कोसळेली,त्याचसोबत घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या वादळाचा फटका नगर जिल्ह्यातील काही भागास बसला असून आज शहरातील कानडे मळा येथील एका शेतकऱ्याच्या म्हशींच्या अंगावर वीजवाहक तार तटून पडल्याने यात तब्बल ६ म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की, शनिवारी रात्रीपासूनच मुंबईसह आसपासच्या भागात तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ नगर शहरामध्येही तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

सोमवारी नगर शहरातील कानडेमळा येथील शेतकरी सदाशिव भाऊसाहेब निस्ताने यांच्या ३० म्हशी कानडेमळा जवळीन भिंगारनाल्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान शनिवारपासूनच नगर जिल्ह्यात देखील तौक्ते चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा सुटलेला होता.

सोमवारी या वाऱ्याचा वेग अधिक झाला आहे. त्यामुळे  या भागातील विजेच्या तार तुटून त्या या म्हशींच्या अंगावर पडली. त्यामुळे विजेचा  झटका या म्हशींना बसला व त्या जागीच ठार झाल्या.

त्यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे ९ ते१० लाख रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आ.संग्राम जगताप यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामा करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe