अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन दिवसापुर्वी मृत झालेल्या ५६ वर्षीय महीलेला करोनाचा ससर्ग झाला होता. गुरुवारी सकाळी तीचा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला. त्यामुळे सुपा परिसरात खळवळ उडाली आहे.
मृत महिलेच्या संपर्कातील दहा व्यक्तीना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. महिलेवर उपचार करणारे रुग्णालय सिल केले आहे.
महिला रहात असलेला एरिया बॅरिकेट लावून येण्या जाण्यासाठी बंद केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुपा बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
सुपे येथील ५६ वर्षीय स्थानिक महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली. या महिलेस त्रास होऊ लागल्याने सुपे येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तेथे उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याऐवजी निरामय हॉस्पिटलच्या डॉक्टरने पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यात तिचा मृत्यू झाला.
मृत्यूपश्चात घेण्यात आलेल्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने या महिलेच्या संपर्कात आलेल्या ३३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी घेतले आहेत.
दरम्यान, निरामय हॉस्पिटलच्या डॉक्टरला महसूल प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र,
दोन्ही बैठकांना डॉक्टरने दांडी मारली होती. महिलेच्या उपचाराबाबतही हलगर्जीपणा केल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews