अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात भानस हिवरे गावात जमिनीच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नईम अब्दुल्लतीफ देशमुख (वय 55 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या खून प्रकरणी नेवासा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मयत नईम व त्याचे मोठा भाऊ नदीम अब्दूलतीफ देशमुख व लहान भाऊ मोईन अब्दूलतीफ देशमुख, रफिक अब्दूलतीफ देशमुख यांच्यामध्ये नेवासा तालुक्यातील भानस हिवरे येथील जमिनीवरून वाद सुरू होते.
रविवार दि.20 डिसेंबर रोजी हे चौघे भाऊ नगरहुन भानसहिवरे येथे जमीन वाटप करून भांडण मिटविण्यासाठी आले होते.जमीन वाटपावरून त्यांच्या बाचाबाची झाली.
बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले.भानस हिवरे येथील ऐतिहासिक गढीच्या पायथ्याशी असलेल्या एका टपरी जवळ नईमला तीक्ष्ण हत्याराचे वार करून मारहाण केली.त्याला जखमी अवस्थेत उपचरासाठी नेत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला, मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे.
पोलिसांनी नईमचे सख्खे भाऊ नदीम अब्दूलतीफ देशमुख,मोईन अब्दूलतीफ देशमुख,रफिक अब्दूलतीफ देशमुख या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com