अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा पुन्हा हादरला,अंगावर ट्रॅक्टर घालून एकाचा खून !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा खुनाच्या घटनेने हादरला आहे,पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात येथे किरकोळ वादातून पुतण्याने सख्या चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जागीच ठार केले आहे.

ही घटना आज दुपारी घडली आहे. वादाचे कारण अद्याप समजले नसून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे,घटनेतील मयत बाबासाहेब व संशयीत आरोपी तुळशीराम हे एकमेकांचे साडू आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,अकोला येथील मयत पिंटया उर्फ बाबासाहेब देवराव गिरी (वय ४५)व त्यांचे थोरले बंधू दत्तु देवराव गिरी अकोला गावात वस्तीवर राहातात.

रविवारी दुपारी दोघा बंधुमध्ये दत्तु गिरी यांच्या वस्तीवर किरकोळ स्वरूपाचे वाद झाले. परंतु ते मिटल्यानंतर बाबासाहेब गिरी हा आपल्या घरी गेले.

मात्र बाबासाहेब गिरी यांच्या वस्तीवर दत्तु गिरी याचा ट्रॅक्टर होता. ते आणण्यासाठी दत्तु गिरी याचा मुलगा पिल्या उर्फ तुळशीराम दत्तु गिरी हा चुलता बाबासाहेब गिरी याच्या घरी गेला.

त्याने ट्रॅक्टर चालू केले, त्यावेळी वडिल व चुलत्यामध्ये झालेल्या वादाचा राग डोक्यात असलेल्या पिल्या उर्फ तुळशीराम दत्तु गिरी याने स्वतःच्या घराच्या दारात असलेले चुलते बाबासाहेब गिरी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला.

बाबासाहेब गिरी हे यात गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी पाथर्डी येथे उपाजिल्हा रुग्णालयात हालविले मात्रे ते जागीच ठार झाले होते.

दरम्यान, या घटनेत झटापटीत इतर तिघेजण सुद्धा जखमी झाले आहेत. संशयीत आरोपी पिल्या उर्फ तुळशीराम दत्तु गिरी यासपोलिसांनी ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे.

गेल्या आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यात तर काल श्रीरामपूर तालुक्यात खुनाच्या घटना उघडकीस आल्या होत्या त्यानंतर आजच्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून लॉकडाऊन शिथील होताच अहमदनगर जिल्ह्यातील गुन्ह्याची संख्या वाढू लागली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment