अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरच्या पत्नीची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- अकोले तालुक्यातील कोतूळ येथील डॉ. रोहित भुजबळ यांची पत्नी अश्विनी (वय २७) यांनी रविवारी दुपारी साडेबारा वाजता राहत्या घरात आत्महत्या केली.

या घटनेने खळबळ उडाली. डाॅ. भुजबळ यांचा विवाह चार वर्षांपूर्वी नवलेवाडी-माळीझाप येथील अश्विनी यांच्याशी झाला होता. त्या औषध निर्माण शास्रातील पदवीधर होत्या.

पती, सासरे, सासू, दीर हे सर्व वैद्यकीय व्यावसायिक आहेत. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातील एका खोलीत ओढणीच्या साहाय्याने अश्विनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.

पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. अश्विनी यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे.

अश्विनी मनाने खूप खंबीर होती. त्यामुळे ती आत्महत्येसारखे कृत्य करू शकत नाही, अशी भावना तिचा भाऊ सुनील गलांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

माहेरच्या नातेवाईकांच्या विनंतीनुसार अश्विनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोले येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment