अहमदनगर ब्रेकिंग : व्हॉट्सअ‍ॅप डिपी डाऊनलोड करीत अश्लील चित्रफिती बनविण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- फेसबुक अकाऊंटवरील फोटो तसेच व्हॉट्सअ‍ॅप डिपी कॉपी करून त्याला अश्लील बनवत खंडणी मागणार्‍या आरोपीला सायबर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.

अमोल उत्तम कुसमुडे (वय 29, रा. वांबोरी, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे.

आरोपीस 18 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत? याचा पोलीस तपास करत आहेत.

नगर येथील फिर्यादीच्या फेसबुकवरील फोटो अज्ञात इसमाने 8 ते 13 जुलैच्या दरम्यान कॉपी करून मॉर्फिंग केले. त्याचे अश्लील फोटो बनवत त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले.

ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल न करण्यासाठी 30 हजार रूपयांची खंडणी मागण्यात आली. यासंदर्भात फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार सायबर पोलीस शाखा अहमदनगर येथे भादंवि. 384 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली. ही टोळी महिलांचे फेसबुकवरचे फोटो तसेच फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर मोबाईल नंबर मिळवित व्हॉट्सअ‍ॅप डिपीचे फोटो डाऊनलोड करीत अश्लील चित्रफिती बनविण्याचा उद्योग करत होते.

त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत संबंधितांकडून पैसे वसूल करत. संबंधित पीडितांनी खंडणी देऊन मौन बाळगले होते. मात्र, आता याप्रकरणाला वाचा फुटली आहे.

संबंधित मोबाईल नंबर हा एका महिलेच्या नावावर आहे. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी जुने वापरलेले मोबाईल विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या आरोपीविरूद्ध आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण परदेशी करीत आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment