अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता रविंद्र संसारे यांना ठेकेदार शरद शिवराम पवार याने मारहाण केली.
याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार पवार हा फरार झाला आहे. जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत रविंद्र संसारे यांनी म्हटले आहे की,
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/06/IMG_20210625_150830.jpg)
२३ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात करण्यात आलेल्या हळगांव ते आगी हळगांव ते गोयकरवाडी रोडचे कामाची पाहणी करुन
स्कॉर्पियो एमएच-१६एन-०५५५० या वाहनाने हाळगाव ते ढवळेवस्ती रोड ची पाहणी करण्यासाठी निघालो असता हळगाव बस स्थानक परिसरात ठेकेदार पवार याने आमच्या सरकारी गाडीला आडवे येऊन
तुम्ही मला शिऊर ते बसरवाडी रस्त्याचे केलेल्या कामात वापरलेल्या खडीचे पैसे का दिले नाहीत असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली व मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम