अहमदनगर ब्रेकिंग : पंतप्रधान उज्वला योजनेतून मिळालेल्या सिलिंडरचा स्फोट

Ahmednagarlive24
Published:

नगर तालुक्यातील भोरवाडी येथील पद्मावती वस्तीवर घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना आज रात्री साडेसात वाजता घडली. 
विमल बबन जाधव यांच्या घरात ही घटना झाली. विशेष म्हणजे, हा सिलिंडर पंतप्रधान उज्वला योजनेतून मिळालेला आहे.

विमल जाधव या स्वयंपाकाच्या तयारी करत होत्या. त्यामुळे त्यांनी गॅस शेगडी पेटवली. परंतु सिलिंडरच्या रेग्युलेटरजवळ गॅस गळती सुरू झाली. त्याच मोठा आवाज झाला. 

हा आवाज येत असतानाच विमल यांच्याकडून गॅस शेगडी पेटवली गेली होती. तेवढाच सिलिंडरने मोठा भडका घेतला आणि स्फोट झाला. 
परंतु विमल जाधव यांनी प्रसंगावधान राखत घराबाहेर पळ काढला आणि आरडाओरडा केला.

त्यानंतर सिलिंडरने अधिकच भडका घेतला. आग घरात पसरत होती.उज्ज्वला बाबासाहेब जाधव आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनी विमल यांच्या घराकडे धाव घेतले. उज्वला जाधव आणि काही ग्रामस्थांनी धाडस करत पेटता सिलिंडर घराबाहेर काढला. 

सिलिंडर विझविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु त्याला यश आले नाही. काहींनी त्यावर गोधडी टाकली. ते देखील पेटली. 
 सिलिंडरमधील गॅसमुळे जाळ चांगलाच भडकला होता. तो 15 फुटाच्या उंचीपर्यंत ज्वाला होत्या. त्यातच रामदास तांबे यांनी गॅस सिलिंडर वितरकाशी संपर्क साधून सिलिंडरच्या स्फोटाची माहिती दिली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment