अहमदनगर ब्रेकिंग : निसर्ग चक्रीवादळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Published on -

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळीमुळे झालेल्या नुकसानीने अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

विलास दामू एखंडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी कांदा व टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतलेे होते. या निसर्ग वादळामुळे २०० ते २५० गोणी कांद्याचे आणि टोमॅटोच्या फडाचे नुकसान झाले.

मुलांच्या शिक्षणाासाठी पैशाची अडचण दूर करण्यासाठी उसनवारी केली होती. यातून त्यांनी कवडदरा येथे विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe