अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यास काल संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले.
संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.
बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
सुनील गणपत फटांगरे (वय४५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी सुनील फटांगरे बुधवारी आपल्याशेतातील हरभरा पिकाची काढणी करत होते.
शेतात काम करत असताना संध्याकाळी सहाच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले.
काही क्षणात त्याच्या अंगावर वीज पडल्याने फटांगरे यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com