अहमदनगर ब्रेकिंग : पोटच्या मुलीवर बापाने केला बलात्कार; पोलिसांनी केली अटक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : जन्मदाता बापानेच स्वताच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे

आरोपीची पत्नी आणि मुलगा शेजारी मामाच्या घरी गेले असताना रात्री घरी असणारी १५ वर्षाची पोटची पोरगी एकटी पाहून ३५ वर्षाच्या नराधम बापाने तिच्यावर अमानुष पणे दोन वेळा बलात्कार केला.

सकाळी तिची आई परतल्यानंतर पीडित मुलीने हकीकत कथन केल्यावर त्या दोघींनी थेट पोलिसात धाव घेत फिर्याद दिली.

श्रीगोंदे शहरातील हा प्रकार असून या कुटुंबातील आरोपी वडील व त्यांची नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली मुलगी घरात रात्रीचे वेळी दोघे होते.

आरोपीची पत्नी व मुलगा त्यांच्या मेव्हण्याच्या घरी थांबले होते. रात्री बारा वाजल्या नंतर आरोपी बापाने पोरीवर जबरदस्तीने बलात्कार करीत बाप नावाला कलंक लावला.

दरम्यान पीडित मुलीची आई सकाळी घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईच्या कानावर घातला. हे ऐकल्यानंतर त्या मातेची शुद्धच हरपली.

दुपारी या दोघी मायलेकींनी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व हकीकत सांगितल्यानंतर तातडीने आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध बलात्कार व पोस्को या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment