अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- कर्जत तालुक्यात शीघ्र कृती दलातील चार जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज निष्पन्न झाले असून कर्जत येथे रथयात्रेनिमित्त बंदोबस्तासाठी असलेल्या या टीम मधील कर्जत मध्ये दोन युवक बंदोबस्तासाठी होते,
यामुळे कर्जत कराना धडकी भरणार आहे, सदर टीम आठ दिवस कर्जत तालुक्यात बंदोबस्तासाठी होती, नगर येथे त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यास तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दुजोरा दिला आहे आहे.
या जवानांच्या कर्जत शहरातील सम्पर्कातील लोकांची माहिती घेण्याचे अत्यंत जिकरीचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे. सदर च्या जवानांनी रथा समोर झालेली गर्दी आवरण्यासाठी काम केल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला असून
यामुळे अनेकांच्या चिंतेत भर पडणार आहे, रथासमोर सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकारी सहभागी झाले होते त्यामुळे यापुढील प्रशासनाच्या कामकाजाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा