अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने व आणखी एकजण कोरोना बाधित झाल्याने गावात चौदा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना बाधितांच्या संपर्कातील २१ व्यक्तींना नगर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी निमोण येथे भेट देत माहिती घेतली.
त्यानंतर त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. प्रसंगी प्रभारी सरपंच दगडू घुगे, संदीप देशमुख, अनिल घुगे, ग्रामविकास अधिकारी एस. वाय. मिसाळ, बबन सांगळे उपस्थित होते.
ज्या भागात कोरोना बाधित आढळून आले तो सर्व परिसर सील करण्याच्या सुचना प्राताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सबंधितांना दिल्या.
निमोण गावच्या ४३२५ लोकसंख्येपैकी कोरोना बाधित क्षेत्रातील १३७७ लोकसंख्येसाठी आरोग्य विभागाची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.
या पथकांद्वारे चौदा दिवस रोज आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती संगमनेर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली.
दरम्यान पिंपळे येथील एका व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यास उपचारार्थ हलविण्यात आले आहे.गावात पोलीस पथकही तैनात करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन कोरोना सुरक्षा समितीने केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com