अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहरातील साई स्पंदन ह्या कोवीड सेंटरवर गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली असून.शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घटनेनंतर कोवीड सेंटर चालविणारे डॉ. रोहित रमेश आहेर यांनी शनिवारी मध्यरात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून विजय आसाराम रासकर, दीपक लक्ष्मण पवार, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा दळवी यांच्या विरोधात
मारहाण,सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, सार्वजनिक शांततेचा भंग, शासकीय आदेशाचे उल्लंघन आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विजय रासकर, दीपक पवार व विनायक कुलकर्णी यांना अटक केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved