अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले , एकूण कोरोनाबाधित @544 !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये नगर शहर ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान आज सकाळी २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.
आज जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले.

आज दिवसभरात १५० व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.

  • जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या; ३६९
  • उपचार घेत असलेले रुग्ण : १६०
  • मृत्यू: १५
  • एकूण रुग्ण संख्या : ५४४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment