अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- बाहेरून येणार्या लोकांमुळे अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे, समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका 39 वर्षीय तरुण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे अकोले तालुक्यात हा तिसरा रूग्ण झाला आहे. तो 19 मे रोजी गावात आला होता. त्यानंतर त्याला काल जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला उपक्रेंद्रात पाठविण्यात आले होते.
मात्र, त्यास जास्त त्रास होत असल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज उशिरा त्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला यात त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com