अहमदनगर ब्रेकिंग : गावठी दारू तस्करीचा मोठा अड्डा उध्वस्त !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील हरवाडी येथे सुरू असलेला गावठी हातभट्टी दारूची मोठी भट्टी स्थानिक गुन्हे शाखेने आज उद्ध्वस्त केली.

तेथून गावठी तयार दारू तयार करण्यासाठी लागणारे जळके रसायन व इतर साहित्य असा सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. येथून अनेक ठिकाणी गावठी दारूची तस्करी केली जात होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार , यांना गुप्त बातमीदारांकडून माहीती मिळाली की , खारवाडी, ढवळपूरी, ता – पारनेर येथे काही इसम गावटी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी भट्टी लावून गावठी दारु तयार करतात.

सदर दारुची आजूबाजूच्या परिसरामध्ये चोरुन विक्री होते. खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहीती पोनि / दिलीप पवार यांनी त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांना कळवून मिळालेल्या बातमीनूसार खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले .

त्याप्रमाणे पथकातील पोहेकॉ / बबन मखरे , सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , पोना / आण्णा पवार , रविन्द्र कर्डीले , राहूल सोळूके , विनोद मासाळकर , चा . पोहेकॉ / बाळसाहेब भोपळे अशांनी मिळून दोन पंचाना सोबत घेवून ढवळपूरी येथे जावून मिळालेल्या बातमीनूसार खात्री केली.

खारवाडी शिवारातील ओढ्याचे कडेला दोन इसम भट्टी लावून गावटी दारु तयार करीत असताना दिसल्याने सकाळी सात वाजता छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

महेन्द्र भाऊसाहेब गव्हाणे (वय – २१ वर्षे , रा . खारवाडी , ढवळपूरी , ता पारनेर ), सोपान हरिभाऊ पवार (वय – ३० वर्षे , रा . साकत , ता – नगर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

सदर ठिकाणची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणी १ , ०० , ००० / – रु . किंमतीचे गावटी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे २००० लीटर कच्चे रसायन, १० , ००० / – रु . किमतीचे गावठी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले २०० लीटर जळके रसायन

, ७००० / – रु . किमतीची गावटी हातभट्टीची ७० लीटर तयार दारु, २ पांढन्या धातुचे घमेले व दोन चाटू असा एकूण १ , १७ , ००० / – रु . किमतीची तयार गावठी दारु तसेच दारु तयार करण्यासाठी लागणारा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment