अहमदनगर ब्रेकिंग : दारु पिऊन भांडण करणाऱ्या वडिलांची आई आणि मुलाकडून हत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- दारु पिऊन येत घरात नेहमीच भांडण करणाऱ्या वडिलांना मुलगा व पत्नीने काठी व दगडाने बेदम मारहाण केल्याने त्यात भरत धोंडीराम वरखडे यांचा मृत्यू झाला. घटना संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे शुक्रवारी रात्री घडली.

याप्रकरणी आश्वी पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला पेालिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी तालुक्यातील झरेकाठी येथील रिक्षाचालक भरत वरखडे हे नेहमी दारु पिऊन घरात भांडण करत.

शुक्रवारी (दि. २२) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरत वरखडे, त्यांची पत्नी मंदा व मुलगा दादासाहेब यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात भरत वरखडे यांनी मारहाण केल्याने पत्नी मंदा जखमी झाली होती.

त्यामुळे मुलगा दादासाहेब याने स्थानिक खासगी दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार केले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी आलेल्या दादासाहेब याने सततचे भांडण व आईला केलेल्या मारहाणीमुळे काठी तर पत्नी मंदा हिने दगडाने भरत वरखडे याना बेदम मारहाण केली. यात भरत वरखडे यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक फौजदार रामनाथ मोरे, मुख्य हवालदार संजय लाटे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेंगाळ, आर. बी. भाग्यवान, शिंदे, दहीमिवाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी रोशन पंडित यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. आश्वी पोलीस ठाण्यात अक्षय कैलास आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई व मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर हे पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. भारत वरखडे यांच्या मृतदेहाचे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment