अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- महावितरणच्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने शाॅर्टसर्किट होऊन हायवा डंपरने पेट घेतल्याने काहीकाळ चांगलीच खळबळ उडाली. या घटनेत डंपरच्या मागील भागाचे दीड लाख रुपये किमतीचे आठ टायर जळून खाक झाले.
राहुरीचे वाहतूक पोलिस, तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास मदतकार्य केल्याने पुढील अनर्थ टळण्यास मदत झाली आहे.
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी काॅलेजजवळ असलेल्या परफेक्ट मोटार गॅरेजलगत आगीची ही घटना घडली. खडी खाली करण्यासाठी हा डंपर घटनास्थळी आला होता.
हायड्रॉलिक डंपरचा मागील भाग उंचावताना महावितरणच्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने शाॅर्टसर्किट होऊन डंपर पेटला गेला. पेटलेल्या डंपरच्या आगीची तीव्रता मोठी असल्याने भीतीपोटी राज्य महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबली गेली.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची खबर राहुरी पोलिस, तसेच अग्निशमन दलाला दिल्याने पोलिस काॅन्स्टेबल मनोज राजपूत, अशोक कोळगे, होमगार्ड जाधव,
तसेच अग्निशमन दलाच्या पथकातील विलास गडाख, सुरेश वाघ, नंदू मोरे, बाळासाहेब पवार, सिद्धार्थ मोरे हे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये