अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अकोले तालुक्यात एका तरुणाचा खून करून मृतदेहाचे तुकडे करत गोण्यात भरून नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अकोले तालुक्यातील वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा खुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे येथील कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिले आहेत.
कृष्णावंती नदीच्या पात्राच्या दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच वाकीचे पोलीस पाटील सोमनाथ सगभोर यांनी ही घटनेची माहिती राजूर पोलीस ठाण्यास कळवली.
माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी त्या ठिकाणी एका 20 ते 25 वयोगटातील एका अज्ञात तरुणाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते तुकडे दोन गोण्यात भरून फेकून दिल्याचे आढळून आले असल्याचे सपोनि पाटील यांनी सांगितले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews