अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात कारणावरून एकाचा खून

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात राधू सहादू कोकरे ४५ (रा. ढवळपूरी ता. पारनेर) या भटकंती करून उपजिविका करणा-या मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने हत्याराने डोक्यात मारून खून करण्यात आला आहे.

ओळख पटू नये म्हणून आरोपीने खडकवाडी शिवारात आडरानात प्रेत नेउन ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राधू कोकरे यांची पत्नी जनाबाई राधू कोकरे ४० (रा. ढवळपूरी, ता. पारनेर हल्ली रा. वायशेत, अलिबाग रायगड) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!