अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून झाला असून याप्रकरणी राहाता पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चुलत्याचे पुतणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या पतीकडून राहाता न्यायालयाच्या मागील मोकळ्या जागेत दोघा जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका जणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांत शाम जेजूरकर (वय-26,नायगाव, ता. सिन्नर) याने फिर्याद दिली आहे की,

याबाबत दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे कि, दि. 11 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी पाच ते साडेसात वाजेच्या सुमारास प्रविण बाळकृष्ण बनकर व त्याचा भाऊ सचिन बाळकृष्ण बनकर व इतर आणखी दोन अनोळखी इसम यांनी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून राहुल जेजूरकर व शाम जेजूरकर यांना राहाता कोर्टामागे पिंपळस हद्दीत बोलावून लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.

घटनेनंतर या दोघांना शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले असता राहुल जेजूरकर याचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe