अहमदनगर ब्रेकिंग : लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने केली आईची हत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुलीबरोबर लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या आईची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत सविता सुनील गायकवाड ( वय ३५ ) ही महिला ठार झाली . ही घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली . या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील पारनेर – अळकुटी मार्गावर वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांना येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात एका तरुणाने स्वतःकडील पिस्तूल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

लागोपाठ झाडलेल्या तीन गोळया डोक्यात , हातात व मनगटात घुसल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाला. याबाबत मयत महिलेचा नातेवाईक संतोष कचरू उबाळे याने पारनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राहुल गोरख साबळे रा . रांधे , ता . पारनेर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील , पारनेरचे सहाय्यक पो . नि . राजेश गवळींसह पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन घटनेची माहिती घेतली . राहुल याने मयत महिलेला  मुलीबरोबर लग्न लावून देण्याची मागणी केली होती.

परंतू या लग्नास मयत सविता गायकवाड यांचा विरोध होता . यावरून मयत सविता गायकवाड व आरोपी राहुल साबळे यांच्यात वाद होत होता . याबाबत मयत गायकवाड यांनी पोलिसांत तक्रारही दिली होती . याचाच राग येऊन आरोपी राहुल याने सविता यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांचा खून केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment