अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याचा संशय घेत पत्नीस चाकूने भोसकत पतीने घेतला गळफास !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :-  देशात आणि राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात शिर्डी शहरातील संभाजीनगर मध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने चिडून पत्नीची हत्या करण्याच्या प्रयत्नात तिला चाकूने भोसकले व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले.

मात्र पत्नी जबर जखमी झाल्याने आसपासच्या लोकांनी तीला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले.

गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात शांतता वाटत असताना हा प्रकार शिर्डीत घडल्याने शिर्डी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी येथील संभाजीनगर भागात राहणारे कैलास दिवाकर ठोकळ याची पत्नी अनिता कैलास ठोकळ या दोघांचे आपापसात नेहमी भांडण होत होते,

कैलास ठोकळ आपल्या पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता ,यातून त्यांचे नेहमी वादावादी होत होती, असेच काल रात्री कैलास आणि पत्नी अनिता याच्यांत चारित्र्याच्या संशयावरून दोघांत भांडण झाले ,

त्यामुळे कैलास ठोकळचा मुलगा चंद्रकांत हा आपल्या घर मालकाला बोलण्यास जात असतानाच कैलास ठोकल्याने रागाच्या भरात चाकूने आपली पत्नी अनिता ठोकळ हिच्यावर वार केले,

चाकूने अनिताला भोकल्यामुळे ती जबर जखमी झाली, व खाली पडली, हे पाहताच स्वतः कैलास ठोकळ याने दोरीने आपला गळा आवळून स्वतःचे जीवन संपवले,

पत्नी मात्र जबर जखमी झाल्याने व मुलाने चंद्रकांत आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा होऊन या जखमी महिलेला शिर्डीचे श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment