अहमदनगर ब्रेकिंग : जामखेड तालुक्यातील ‘त्या’ मुलीची हत्या नव्हे तर आत्महत्या ! प्रियकराने….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे घडली आहे .

या प्रकरणी अरणगाव येथील एका अल्पवयीन मुलाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोणगाव येथिल एका अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांपुर्वी विहीरीत मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणी फीर्यादी मयत मुलीचे आजोबानी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीर्यादीत म्हंटले आहे की मयत अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा हे दोघे अरणगाव येथे एकाच शाळेत शिकत होते. या दोघांचे एक वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते.

ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी आरोपी मुलाच्या आरणगाव येथील घरी येऊन मुलास व मुलाच्या आईवडिलांना फीर्यादीने सदर मुलगी ही अजुन लहान आहे, तीचे शिक्षण सुरू आहे त्यामुळे तुम्ही मुलीचा नाद सोडा असे सांगितले.

मुलीच्या घरच्यांनी समजुन सांगुनही त्या दोघांचे प्रेमप्रकरण सुरूच होते. यानंतर आरोपी मुलाने मुलीसोबत लग्न करण्याचे अश्वासन मुलीस दिले होते. मात्र काही महीन्यानंतर पुन्हा मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या मुलीने आत्महत्या केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment