अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आल्याने एकाची गळफास घेत आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आल्याने एका उसतोड मजूराने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव – ने येथे घडली.

देविदास रामदास माळी (वय-३५वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची बनल्याने उपासमार होत होती.

या रोजच्या उपासमारीला कंटाळुन बुधवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व व्यक्ती घराबाहेर गेल्याची संधी साधुन देविदास माळी याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

शेजारच्या लोकांनी धावपळ करून त्यास गावातील खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी शेवगावला घेऊन जात असताना त्याचे रस्त्याने निधन झाले.

त्याच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे. शेवगांव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल राजु केदार हे करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment