अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय संभाजी बोऱ्हाडे (वय-५५,रा, केळी -ओतूर,ता.अकोले) यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.
अकोले तालुक्यातील सातेवाडी गणातून ते पंचायत समिती वर निवडून गेले होते.भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती.

त्यांच्या गावी विहिरीचे काम सुरू होते.काम पाहण्यासाठी सोमवारी दुपारी ते विहिरीत उतरले होते,
यावेळी विहिरीतून बाहेर येत असतांना दोर सटकला व ते खाली विहिरीत पडले या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
त्यांना प्रारंभी संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी
दाखल करण्यात आले होते.तेथे त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली.उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज सकाळी नाशिक येथे उपचारां दरम्यान रूग्णालयातच त्यांचे निधन झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com