अहमदनगर ब्रेकिंग : पगार थकवल्याने शिपायाची आत्महत्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील नांदूरपठार ग्रामपंचायतीच्या शिपायाने गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. पगार थकल्याने ३६ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

या वृत्ताला तहसीलदार ज्योती देवरे यांनी दुजोरा दिला.पगार नाही, शिवाय शेतीतून काहीही उत्पन्न येण्याची शास्वती नसल्याने राजू बबन आग्रे चिंतेत होता. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

टाकळी ढोकेश्‍वर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!