अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा ! 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : चक्क माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली.

यात महावितरणचे अधिकारी सुधीर वसंतराव कन्नावार यांनी दिलेल्या  फिर्यादिवरून माजी नगराध्यक्ष अनिल श्यामराव कांबळे यांच्याविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिल कांबळे हे वेस्टन अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. फ्लॅटमध्ये महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या २ हजार ६५९ युनिटची ३४ हजार ७१५ वीज चोरी केली.

दोन वर्षापासून १७ मार्च २०२० या कालावधीत ही चोरी केली आहे. कांबळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

अपार्टमेंटमध्ये राहणारे अमरनाथ निवृत्त जगदाळे यांच्यावरही असाच गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षापासून १७ मार्च २०२० पर्यंत ५ हजार ४८५ युनिट विजेचे ७३ हजार ४७ रुपयांची वीज चोरी केली. वीज चोरीचे दोन्ही गुन्हे वेगवेगळे दाखल करण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment