अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील लॉजवर पोलिसांनी छापा टाकून हाय प्रोफाइल देहविक्री व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेत त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली.
व्यवस्थापनाच्या दोन व्यक्तींविरोधात पिटा कायद्यांतर्गत बुधवारी कारवाई करण्यात आली. प्रवीण बाळासाहेब पानसंबळ (निर्मळ पिंप्री), अरबाज मोहंम्मद शेख (बाभळेश्वर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी बाभळेश्वर येथील हॉटेलवर छापा टाकला, त्यावेळी दोन पीडित महिलांकडून देहविक्री करून घेत असल्याचे आढळले. दोन्ही महिलांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेत त्यांची रवानगी संगमनेर येथील महिला सुधारगृहात केली.
राधा रघुनाथ टोपे (श्रीरामपूर शहर, पोलिस स्टेशन) यांच्या फिर्यादीहून हॉटेलचे प्रवीण पानसंबळ व अरबाज शेख यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई श्रीरामपूर पोलिस स्टेशनचे परिविक्षाधीन अधिकारी आयुष नोपानी, नेवासे स्टेशनचे परिविक्षाधीन अधिकारी अभिनव त्यागी, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संजय मिटके यांनी केली. शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव यांच्या माहितीनुसार ही कारवाई झाल्याचे समजते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये