अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरातील शिवाजी चौकाजवळच असलेल्या एका लॉजवर छापा टाकला, या लॉजमध्ये चितळी येथील एकजण महिलांशी अनैतिक सबंध ठेवण्यास भाग पाडत असताना पोलिसांनी त्यांच्याकडून 3 हजार रुपये रोख, निरोधची पाकिटे तसेच 37 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले.
तसेच अनैतिकपणे वेश्या व्यवसाय करणार्या पीडित महिलांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरात लॉजवर वेश्या व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयुष नोपाणी यांना मिळाली असता
त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक मसूद पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एस. आरोळे, एस. जी. औटी, पोलीस कॉन्स्टेबल ए. बी. पठाण,
एन. एस. चव्हाण व महिला पोलीस नाईक जे.एस. घाडगे,अश्विनी पवार, पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर या पथकाने श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकाजवळच असलेल्या पंचशील लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवून दोन पंचासमक्ष छापा मारला असता त्याठिकाणी गणेश विश्वनाथ खैरनार (रा. चितळी, ता. राहाता)
हा त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पैशाची देवाण-घेवाण करून महिलांशी अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असताना 3 हजार रुपये रोख , निरोधचे पाऊच, 37 हजार रुपये किंमतीचे मोबाईल मिळून आले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गणेश विश्वनाथ खैरनार याचेविरुध्द भादंवि कलम 370 सह स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांची सदर ठिकाणाहून सुटका करण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved