अहमदनगर ब्रेकिंग : बलात्कार केलेल्या आरोपीचा जागेवर केला ‘फैसला’… असा घेतला त्या नराधमाचा जीव !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले तालुक्यातील शिरपुंजे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे रानात गुरे चारणाऱ्या महिलेवर बालात्कार करुन पसार झालेल्या आरोपीस पकडून त्यास जीवे मारल्याची घटना समोर आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि अकोले तालुक्यातील शिरपुंजे गावात राहणारी एक ५५ वर्ष वयाची गरीब मागास शेतकरी महिला तिच्याजवळील जनावरे चारण्यासाठी जायनावाडी गावच्या शिवारात गेली होती

या दरम्यान राजू देखील बकऱ्या चारण्यासाठी तेथे गेला होता. बुधवार दि.५ रोजी दुपारी दोघे रानात असतांना राजूने पीडित महिलेशी लगट केली. तिने विरोध केला, मात्र, बळजबरी करीत आरोपीने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार एका व्यक्तीने पाहिला असता त्याची वाच्चता झाली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने नातेवाईकांना कथन केला.

त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी राजूचा शोध सुरु केला. मात्र, त्याने थेट जंगलात पळ काढला. दरम्यान त्यास पकडून एका बाकड्याला बांधून उपरोक्त आरोपींनी बेदम मारहाण केली. राजू जायबंदी झाल्यानंतर तिघांनी त्यास राजूर पोलीस ठाण्यात आणले.

मात्र, पोलिसांनी राजूची बिकट परिस्थिती पाहता पहिले दवाखाण्यात उपचारासाठी पाठविले. याच वेळी राजूने सांगितले की, या तिघांनी मला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे, पोलिसांनी त्याचा कायदेशीर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

राजुला रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक वाटली. त्यामुळे, स्थानिक डॉक्टरांनी त्यास नाशिकला रवाणा केले. मात्र, अकोले क्रॉर करेपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता.

त्यामुळे, पोलिसांनी महिलेच्या सांगण्याहुन राजुवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तर, ज्यांनी राजुस मारहाण केली. त्यांच्यावर  गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी मयत राजू गणपत सोनवणे यांच्यावर राजूर पोलीस ठाण्याच अत्याचार (३७६) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, राजू यास तिघांनी बांधून मारल्यानंतर तो ठार झाला. त्यानंतर विजय तपासे, अक्षय तपासे व लालु उर्फ महेंद्र तपासे या तिघांवर (३०२) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment