अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- व्हॉट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातून मैत्री होऊन पुढे प्रेम संबंधात रूपांतर आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध करून लग्नास नकार देणाऱ्या सैन्यदलात कार्यरत असलेल्या किरण सुरेश दिघे या तरुणाविरुद्ध अकोले पोलिसांत ३१ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे.
त्यावरून अकोले पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने अकोले पोलिसांत दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, किरण दिघे याने व्हॉट्सॲप, फेसबुकवरून मैत्री करून व्हॉट्सॲप व मोबाइलवरून बोलणे होऊन प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
आरोपीने पीडित मुलीला विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध केले. नंतर लग्नास नकार दिला व पीडित मुलीची फसवणूक केली. यावरून अकोले पोलिसांनी आरोपी किरण सुरेश दिघे (रा. कोहंडी, ता. अकोले, हल्ली नोकरी ठिकाण सीआरपीएफ उडीसा, रा. हरियाणा पिंजोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com