अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच असल्याचे सांगून विवाहित तरुणीवर लॉजमध्ये बलात्कार !

Published on -

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील ३१ वर्षाच्या विवाहित तरुणीस गोंडेगाव येथे रस्त्याने पायी जात असताना आरोपी शफीक युसूफ शेख , वय 39  (रा. दहिफळ ता – शेवगाव) याने कुठे  जायचे असे म्हणून ओळख करुन घरी नेले.

त्यानंतर तो सदर पिडीत महिलेस दहिफळ गावचा सरपंच आहे , असे सांगत महिलेच्या घरी येवू – जावू लागला, गोड प्रेमाच्या गोष्टी बोलत महिलेस प्रेमात पाडून त्यानंतर तरुणीकडून टप्प्याटप्प्याने २ लाख रुपये उसने घेतले .

आरोपी शफीक शेख याने फोनवर केलेल्या प्रेमाच्या गोष्टी रेकॉडींग करुन सदर तरुणीस म्हणाला की, तुझ्या नवऱ्याला ऐकविन. तुझ्या मुलीचे लग्न होवू देणार नाही,

असे म्हणून तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध घरी तसेच येथे शेवगाव येथे सूर्या लॉज येथे, हॉटेल यशराज येथे वेळोवेळी जबरी संभोग केला.

दरम्यान पिडीत तरुणीने बोलणे टाळले तेव्हा आरोपी शेख याने तू माझ्याबरोबर आली नाही तर औषध घेईल, अशी धमकीही दिली, यामुळे तरुणीने घाबरुन पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याचे टाळले.

वरीलप्रमाणे फिर्यादीवरून पिडीत आरोपी शफीक युसूफ शेख याच्याविरुद्ध प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शेखला पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe