अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर शहरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे बीएचएमएसचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थीने आत्महत्या केल्याची घटना शहरातील सारसनगरमध्ये घडली आहे.
अंकिता धर्मा करांडे (वय 24) असे आत्महत्या करणार्या तरुणीचे नाव असून आज मंगळवारी सकाळी ही घटना घडली. अंकिता ही तिच्या कुटुंबियांसोबत नगर शहरातील सारसनगर परिसरात राहत होती.
अहमदनगर शहरातीलच अनभुले कॉलेजमध्ये ती बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. यंदा ती चौथ्या वर्षात शिक्षण घेत होती. अंकिता हिची सध्या परिक्षा सुरू होती.
मंगळवारी सकाळी पावणेसात वाजेच्या दरम्यान अंकिता तिच्या खोलीतून बाहेर आली व पुन्हा रूमध्ये गेली. बराच वेळ अंकिता बाहेर आली नाही.
त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पाहिले असता अंकिताने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसले. घटनेची माहिती समजताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
- बाळ बोठे करणार होता आत्महत्या ? खिशात सापडली ‘ही’ सुसाईड नोट…
- झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या
- अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणी कट्यातून गोळी झाडून युवकाची आत्महत्या
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|