अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- नाशिक विभागाचे पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीची गंभीर दखल घेतल्याने पारनेर पोलिसांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना गुरूवारी रात्रीच वारजे, पुणे येथून ताब्यात घेतले.
मात्र झावरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नगर येथे पोलिसांच्या देखरेखीखाली खासजी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्वतः आयुक्तांनी लक्ष घातल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल होताच झावरे यांचा शोध घेण्यासाठी नेहमीच्याच तिघा पोलिसांना मोहिमेवर पाठविले.
या पथकाने झावरे यांना पुणे येथून ताब्यात घेतले. झावरे यांना उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रास आहे. पारनेर येथे आणण्यात येत असतानाच त्यांना त्रास सुरू झाला.
त्यामुळे पारनेर पोलिस ठाण्यात झावरे यांना ताब्यात घेण्यात येउन त्यांना पुढील उपचारासाठी नगरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची स्टेशन डायरीला नोंद करण्यात आली.
झावरे हे सध्या भारतीय जनता पक्षात आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजपामध्ये सध्या जोरदार राजकिय घमासान सुरू आहे.
तशातच नगर भाजपाचे निमंत्रीत सदस्य असलेल्या सुजित झावरे यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाई न झाल्यास पोलिस प्रशासनापुढील अडचणींमध्ये वाढ होणार होती.
ते टाळण्यासाठी आयुक्त दिघावकर यांनी पारनेर पोलिसांना तात्काळ हालचाली करून झावरे यांच्यावरील कारवाईच्या सुचना दिल्या.
त्यानुसार पारनेर पोलिसांच्या तिघांच्या पथकाने वारजे, पुणे येथून झावरे यांना ताब्यात घेेतले. दरम्यान, झावरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई मात्र करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved