अहमदनगर ब्रेकिंग : फुगलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह आढळला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- नेवासे तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मंदिरामागे चिंचबन शिवारात प्रवरा नदीत सोमवारी सकाळी नेवासे खुर्द येथील पप्पू अब्दुल पठाण (वय ३२) या तरुणाचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

मृताचा भाऊ आयुब अब्दुल पठाण याने पोलिसांना खबर दिली. १८ मे रोजी सकाळी अकरा वाजता भाऊ त्याच्या चार मित्रांबरोबर मजुरीच्या कामासाठी गेला होता, असे त्यात म्हटले आहे.

पोलिस निरीक्षक रणजित डेरे, कॉन्स्टेबल संभाजी गर्जे व हवालदार तुळशीराम गिते यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मृताच्या चार मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment