अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पशुवैद्यकीय डाॅक्टरचा (वय ४०) कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी व दोन लहान मुले आहेत. राहुरी तालुक्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला.
बुधवारी मध्यरात्री नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना डाॅक्टरांची प्राणज्योत मालवली. कामानिमित्त मुंबईत गेले असताना त्यांना बाधा झाली.

File Photo
खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यावर त्यांना हलवण्यात येणार होते. मात्र, गुरुवारी सकाळी नातेवाईकांना डाॅक्टरांचे निधन झाल्याचे समजले. त्यांच्या पुतण्यालाही कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, उपचारांनंतर तो बरा झाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा