अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील मुखेकरवाडी येथील ज्योती जालिंदर मखेकर ( वय २७ वर्षे ) या विवाहितेचा मृतदेह गावातील एका विहिरीत सापडला आहे.
मयत महिलेच्या अंगावर साडी नव्हती. त्यामुळे तिला मारहाण झाली असून तिचा घातपात झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या नातलगांनी व्यक्त केला आहे.

विवाहितेचा मतदेह अहमदनगर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे . याप्रकरणी पोलिसात अकस्मात मत्युची नोंद करण्यात आली आहे .
ज्योती जालिंदर मुखेकर हिचे व तिच्या पतीशी गुरुवारी रात्री वाद झाला होता.
त्यानंतर ज्योतीचा मृतदेह विहिरीत असल्याची खबर पोलिसांना सुदाम आबासाहेब मुखेकर रा . मुखेकरवाडी यांनी दिली,
पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी व सहाय्यक फौजदार सुरेश बाबर यांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.
विवाहितेच्या अंगावर साडी नसल्याने विवाहितेच्या माहेरच्या नातलगांनी तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com