अहमदनगर ब्रेकिंग : नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- अकोले तालुक्यात आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

अकोल्याच्या चास शिवारातील मुळा नदीपाञातील के.टी.वेअर मध्ये पोहायला गेलेल्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला, ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चास गावच्या शिवारात मुळा नदीपाञात के.टी.वेअर येथे आज दुपारी सुनिल तुकाराम वाडेकर (वय ४०) रा.चास,

प्रवीण दत्तात्रय फापाळे (वय ३२) रा.पिंपळदरी व सचिन दत्तात्रय फापाळे (वय ३६) रा.पिंपळदरी हे पोहायला गेलेले असताना पाण्यात बुडून मयत झालेले आहे.

याच नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेल्या आहे .या बंधाऱ्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेजण बुडून मरण पावले .

पोलिस पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले होते, त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी केटी वेअर वर गर्दी केली.

धक्कादायक म्हणजे मृत्यू झालेल्या मध्ये जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक सुनील तुकाराम वाडेकर यांचा समावेश आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment